उंच भरारी घेताना......
  उंच भरारी घेताना......       उंच भरारी घेताना जमीन सुटेल का याची खंत वाटते.   मुळे रोवली जेथे, ती माती पोकळ होईल का याची धास्ती वाटते.     कधी सभोवार होती मऊ मऊ लव्हाळी,   आकाशी गेल्या का जमीन दूर वाटते.....     उरात किती दाटले माझ्या    नयनी येताच दाटू लागते!     मोठे व्हायचे म्हणून घर सोडले,    आता निवारा असूनही नजर भिरभिरू लागते.     आई तुझ्या कुशीत शिरून एकदाचे निजू वाटते,   तुझ्या उबदार छत्राखालीच मला जगू वाटते......