मला जन्म घेऊ द्या...... अर्थ ना कळे मज व्यर्थ हि क्षिणे मन आज जगण्याची कला शिकवते हि उदास भकास वाट... बेसूर भासतो सूर्य -चंद्र जणू कोपली धरा, अन्न पाण्याविना मी कासावीस लाही लाही मातेच्या उदरा... कुणा ना दया इथे कुणाची तारक- मारक एक समान जन्मदाताच गर्भी मारतो कुणाकडे मागू न्याय आज .....
मी एक मुलगी अन तू एक मुलगा... ना प्रेम होते खोटे , ना खोट्या होत्या भावना . तरीही विरह का घडावा, असा काय केला गुन्हा. स्वछ होते मन, पवित्र होते नाते तरी पण, का दुरावलो सांग ना, भांडावे हा प्रश्न माझं पुन्हा पुन्हा.,,, का कुणा ना कळती वेदना, ना कळतील आपल्या भावना रीत न्यारी, न्यारे जगाचे शहाणपण जगालाच दे समजावून म्हणा ! ना भांडण तुझे नि माझे, तरी हा गूढ अबोला एकाच गोष्ट कळे जागी बस मी एक मुलगी अन तू एक मुलगा... तुझ्यात आणि माझ्या फक्त तेच एक नाते असावे अशी का या जगाची मित्थ्या कल्पना .... का तू असू शकत नाहीस भाऊ ,मित्र वा पित्यासमान कसे पटवून देऊ जगाला सांग परमेश्वरा!!!!!!
कळी खुलतांना.... कळत नकळत कळी खुलतांना, तिचे सौंदर्य खुलत असते, सुगंध दरवळत असतो.... लटकेच वाऱ्याच्या झुळुकेने नाचणारी, कळी आता फुल होणार असते. कळी ते फुल हा प्रवास जेवढा सुखद असतो, तेवढेच बदल पण होतात... नैसर्गिकतेने! रंग, देहबोली, हावभाव आणि चंचलता.... कधी बंद पाकळ्यात राहिलेली कळी आज पाकळी पाकळी उकलत जाते. हवे तेवढे स्वतंत्र उपभोग घेण्यासाठी धजावते... तिला मोठे व्हायचे असते आयुष्य संपण्याआधी! तिचे पण ध्येय असतील ना इतरांपरी.. प्रत्येक पाकळी वेगळी असली तरी एकाच सुगंध तिला, छटा रंगांची बदलणारी , तरी हर्ष तिला. कोणी तोडून नेईल याची माळ्याला भीती, कोणी कुस्करून टाकेल , करते जननी काळजी, कोणी भुंगा यावा आणि मधुर सुगंध प्राशन करावा कोणी फुलपाखरू क्षणभर थांबून जावा कोणी मायेने तोडावी आणि अर्पण करावी विधात्याला. मग काय कळीचे आयुष्य नसतेच का सुखद ती हि वाट पाहत असेल कोण्या एका स्पर्शाची होणाऱ्या हर्ष्याची, अदभूत आनंदाची आणि सुरक्षिततेची .....
Comments
Post a Comment