मी एक मुलगी अन तू एक मुलगा...

मी एक मुलगी अन तू एक मुलगा...


ना प्रेम होते खोटे , ना खोट्या  होत्या भावना .
तरीही विरह का घडावा, असा काय केला गुन्हा.
स्वछ होते मन, पवित्र होते नाते तरी पण,
का दुरावलो सांग ना, भांडावे हा प्रश्न माझं पुन्हा पुन्हा.,,,

का कुणा ना कळती वेदना, 
ना कळतील आपल्या भावना 
रीत न्यारी, न्यारे जगाचे शहाणपण 
जगालाच दे समजावून म्हणा !

ना भांडण तुझे नि माझे, तरी हा गूढ अबोला 
एकाच गोष्ट कळे जागी बस 
मी एक मुलगी अन तू एक मुलगा...

तुझ्यात आणि माझ्या फक्त तेच एक नाते असावे 
अशी का या जगाची मित्थ्या कल्पना ....
का तू असू शकत नाहीस  भाऊ ,मित्र वा पित्यासमान 
कसे पटवून देऊ जगाला सांग परमेश्वरा!!!!!! 

Comments

Popular posts from this blog

माझे कुटुंब

उंच भरारी घेताना......

मला जन्म घेऊ द्या......