माझे कुटुंब
माझे कुटुंब
PRAYAS YOUTH FORUM |
घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती.
इथे असावा प्रेम-जिव्हाळा, नकोत नुसती नाती.
हे विमल लिमयेचें गीत गुणगुणत मी प्रयास मध्ये प्रवेश केला, सप्टेंबर २०१७ च्या वार्षिक कॅम्पमधून. जवळजवळ ८० च्या आसपास मुले मुली होतीत. नवीन चेहरे, नवीन वातावरण, चिखलीचे मुलींचे वसतिगृह आणि आमचे सिनियर मंडळी. दहा दिवस, २५ शाळा आणि प्रचंड विलक्षण अनुभव. कॅम्प मध्ये नवीन मित्र बनली,नवीन उत्साह मिळाला आणि आयुष्यभर जपून ठेवता येतील अशा छोट्या छोट्या मुलांचे निरागस चेहरे आणि त्यांनी भरभरून दिलेले प्रेम! या दहा दिवसात जे मी मिळवले ते शब्दात मांडणे थोडे कठीणच तरी एक प्रयत्न करते - कडाक्याच्या थंडीत पहाटेच्या चार वाजता आमची झालेली सकाळ! प्रार्थना ,परिपाठ आणि दैनिक कार्यभार सोपवून दिवसाची सुरुवात होत असताना तांबडे फुटावे आणि रवी किरणांनी पुलकित झालेली मने, असा काही देखावा.
Blood Donation CAMP 2017 |
शाळेत मुलांना कॉम्पुटर व्यतिरिक्त वैदिक गणित,वैज्ञानिक खेळ,भरपूर कविता आणि खेळ शिकवत असताना खूप काही शिकलो. त्यांची जीवनशैली,राहणीमान,बोली भाषा आणि एकंदरीत परिस्तिथी खूप वेगळी होती. प्रचंड दरी आहे शहरी आणि ग्रामीण भागात असे प्रकर्षाने जाणवले, तरी कुठलीही तक्रार न करता आनंदाने शिकणारी ती फुलपाखरे मनात घर करून गेली. परतीचा प्रवास कठीण होता, अश्रूंनी भरलेली चिमुकल्यांची नेत्र सारखी मागोवा घेत होती आणि आम्ही सुद्धा चिंब मनाने,जड पावले टाकीत होतो.
Street Play camp 2017 |
नंतर मूर्तीदान,एक पेन- एक वही,वृक्षारोपण आणि ब्रह्मगिरी trekking and cleaning अश्या events मधून समोर आलेल्या माझ्याच विविध छटा आणि सुप्त गुणांचे झालेले दर्शन, मलाच अवाक करत होते. अविस्मरणीय तर तो दिवस होता, National
highway वर सादर झालेला पथनाट्याच्या यशस्वी प्रयॊग! सुदैवाने मी सुद्धा पथनाट्याची एक सदस्य होते आणि सुखद अनुभव वेचित होते. त्या दिवशी अनुभवलेला रोमांच आजही अंगावर शहारे आणतो.
माझ्या कुटुंबातील जिवाभावाच्या मंडळींची स्तुती करत नाही पण एक गोष्ट नक्की सांगेल, कधी एकटे वाटणार नाही एवढी माया करणारी नाती आहेत इथे. एका हाकेवर दहा प्रतिसाद येतील एवढा एकोपा आहे इथे.
Comments
Post a Comment