कळी खुलतांना....

कळी खुलतांना....



कळत नकळत कळी खुलतांना,
तिचे सौंदर्य खुलत असते, सुगंध दरवळत असतो....
लटकेच वाऱ्याच्या झुळुकेने नाचणारी, 
कळी आता फुल होणार असते.

कळी ते फुल हा प्रवास जेवढा सुखद असतो,
तेवढेच बदल पण होतात... नैसर्गिकतेने!
रंग, देहबोली, हावभाव आणि चंचलता....
कधी बंद पाकळ्यात राहिलेली कळी 
आज पाकळी पाकळी उकलत जाते.
हवे तेवढे स्वतंत्र उपभोग घेण्यासाठी धजावते...

तिला मोठे व्हायचे असते आयुष्य संपण्याआधी!
तिचे पण ध्येय असतील ना इतरांपरी..
प्रत्येक पाकळी वेगळी असली तरी एकाच सुगंध तिला,
छटा रंगांची बदलणारी , तरी हर्ष तिला.

कोणी तोडून नेईल याची माळ्याला भीती,
कोणी कुस्करून टाकेल , करते जननी काळजी,
कोणी भुंगा यावा आणि मधुर सुगंध प्राशन करावा 
कोणी फुलपाखरू क्षणभर थांबून जावा 
कोणी मायेने तोडावी आणि अर्पण करावी विधात्याला.

मग काय कळीचे आयुष्य नसतेच का सुखद 
ती हि वाट पाहत असेल कोण्या एका स्पर्शाची 
होणाऱ्या हर्ष्याची, अदभूत आनंदाची आणि सुरक्षिततेची .....






Comments

Popular posts from this blog

माझे कुटुंब