अश्रू
का असे वाटते तुला...
अश्रू म्हणजे दुःख, दुर्बलता
अश्रू म्हणजे आक्रोश आणि वेदना.
अश्रू हि आहेत ना एक भावना!
नकळत होणारी प्रतिक्रिया, मनाच्या संवेदना.
आनंद असो व दुःख, डोळ्यातून वाहणाऱ्या.
कधी व्यक्त होणाऱ्या कधी तृप्त करणाऱ्या.
त्या दडपण्यात मजा कसली,
वाहू दे ना ग सखे, का त्यांना शिक्षा असली!
का भेदभाव आसवांवर,
आनंद, हसू वाटून घ्यायचे जगाबरोबर,
आणि का राग- अश्रू- वेदना अंधारलेल्या कोपऱ्याबरोबर!
अश्रू देतात ताकद- हिम्मत आणि ध्येर्य,
विश्वास ठेव , ती चोक बजावतात त्यांचे कार्य.
कोण म्हणतं अश्रू वाईट असतात....
आनंद-उत्साहाने न्हाहून गेलेल्या क्षणात,
सांग बरे का ती डोकावून पाहत असतात?
त्या भावना असतात , आपण जिवंत आहोत
हे असंगणाऱ्या संवेदना असतात ......
Comments
Post a Comment