माझे कुटुंब PRAYAS YOUTH FORUM घर असावे घरासारखे , नकोत नुसत्या भिंती . इथे असावा प्रेम - जिव्हाळा , नकोत नुसती नाती . हे विमल लिमयेचें गीत गुणगुणत मी प्रयास मध्ये प्रवेश केला , सप्टेंबर २०१७ च्या वार्षिक कॅम्पमधून . जवळजवळ ८० च्या आसपास मुले मुली होतीत . नवीन चेहरे , नवीन वातावरण , चिखलीचे मुलींचे वसतिगृह आणि आमचे सिनियर मंडळी . दहा दिवस , २५ शाळा आणि प्रचंड विलक्षण अनुभव . कॅम्प मध्ये नवीन मित्र बनली , नवीन उत्साह मिळाला आणि आयुष्यभर जपून ठेवता येतील अशा छोट्या छोट्या मुलांचे निरागस चेहरे आणि त्यांनी भरभरून दिलेले प्रेम ! या दहा दिवसात जे मी मिळवले ते शब्दात मांडणे थोडे कठीणच तरी एक प्रयत्न करते - कडाक्याच्या थंडीत पहाटेच्या चार वाजता आमची झालेली सकाळ ! प्रार्थना , परिपाठ आणि दैनि...
उंच भरारी घेताना...... उंच भरारी घेताना जमीन सुटेल का याची खंत वाटते. मुळे रोवली जेथे, ती माती पोकळ होईल का याची धास्ती वाटते. कधी सभोवार होती मऊ मऊ लव्हाळी, आकाशी गेल्या का जमीन दूर वाटते..... उरात किती दाटले माझ्या नयनी येताच दाटू लागते! मोठे व्हायचे म्हणून घर सोडले, आता निवारा असूनही नजर भिरभिरू लागते. आई तुझ्या कुशीत शिरून एकदाचे निजू वाटते, तुझ्या उबदार छत्राखालीच मला जगू वाटते......
मला जन्म घेऊ द्या...... अर्थ ना कळे मज व्यर्थ हि क्षिणे मन आज जगण्याची कला शिकवते हि उदास भकास वाट... बेसूर भासतो सूर्य -चंद्र जणू कोपली धरा, अन्न पाण्याविना मी कासावीस लाही लाही मातेच्या उदरा... कुणा ना दया इथे कुणाची तारक- मारक एक समान जन्मदाताच गर्भी मारतो कुणाकडे मागू न्याय आज .....
Comments
Post a Comment