तेरी यादमे.... तेरी यादमे कुछ लिखती, अगर तू नजरे ना चुराती. तेरी यादमे मै खूब रोती, अगर तू मुझे समझ पाती. गुस्सा, बचपना मुझमे भी है पर... शायद प्यार जादा होगया, वर्ना यु आहे ना भरती.... #ग सखे!....
Posts
- Get link
- X
- Other Apps
अश्रू का असे वाटते तुला... अश्रू म्हणजे दुःख, दुर्बलता अश्रू म्हणजे आक्रोश आणि वेदना. अश्रू हि आहेत ना एक भावना! नकळत होणारी प्रतिक्रिया, मनाच्या संवेदना. आनंद असो व दुःख, डोळ्यातून वाहणाऱ्या. कधी व्यक्त होणाऱ्या कधी तृप्त करणाऱ्या. त्या दडपण्यात मजा कसली, वाहू दे ना ग सखे, का त्यांना शिक्षा असली! का भेदभाव आसवांवर, आनंद, हसू वाटून घ्यायचे जगाबरोबर, आणि का राग- अश्रू- वेदना अंधारलेल्या कोपऱ्याबरोबर! अश्रू देतात ताकद- हिम्मत आणि ध्येर्य, विश्वास ठेव , ती चोक बजावतात त्यांचे कार्य. कोण म्हणतं अश्रू वाईट असतात.... आनंद-उत्साहाने न्हाहून गेलेल्या क्षणात, सांग बरे का ती डोकावून पाहत असतात? त्या भावना असतात , आपण जिवंत आहोत हे असंगणाऱ्या संवेदना असतात ......
- Get link
- X
- Other Apps
ग सखे!... तू जाताना, नकळत तुझ्यामागे पावले चालत होते, तू जाताना, अश्रू माझीच नजर चुकवून बाहेर डोकावर होते खूप आपलेपणा दिला कि असे होते का ग सखे! होस्टेलकडे परत पाय वळत नव्हती... सावरलं स्वतःला आणि रूममध्ये परतली, आता तर परिस्तिथी आधीपेक्षाही भयान होती. तू नव्हतीस पण तुझा आभास होता, तू नव्हतीस पण तुझ्या वस्तूंचा सहवास होता, तुझी चप्पल, चादर, बंद कपाट आणि पुस्तकांचा पसारा.... मन भरून आले , खरंच ग सखे नाहीच जमले घळाघळा अश्रू वाहून गेले, सारे कसे थांबून गेले. नेहमी स्वतःच्या घोंडीत शिरणारी मी, आज तुझ्या ब्लॅंकेटमध्ये विसावले होते, तुझी बारीक, निर्जीव उशी उराशी घेउन निजले होते. कोणाच्या वस्तुंना साधा स्पर्शही न करणारी मी, चार बोटे लांब होणारी तुझी चप्पल पायात घालून मिरवत होते. आता रात्र झाली होती, मी कूस बदलत होते, थापटून झोपी जाण्याची सवय का ग लावली! बघ आता, किती जड जाते होते. शेवटी तुझा उबदार, प्रेमळ हात डोक्यावरच आहे, असे स्वतःला समजावत कधीतरी रात्री डोळे मिटले होते.
पहिले प्रेमपत्र
- Get link
- X
- Other Apps
" पहिले प्रेमपत्र " मराठीचा तास असावा कदाचित , पण वर्ग शिक्षक कुठे होते ? कुणास ठाऊक ! वर्गात नुसता गोंधळ आणि दंगा चाललेला . कोणी आपापला अभ्यास करत होते तर कोणी दुसऱ्याची खोडी काढत होते , वाकुल्या दाखवण्यापासून ते वेण्या ओढे पर्यंत , पुस्तके ओढाताडी पासून तर शाळेचे दप्तर फाडे पर्यंत सर्व प्रकार अगदी मज्जेत चालू होते . वर्गात शिक्षक नसल्याचा पुरेपूर आनंद घेण्यात आला होता . काही हुशार मुले - मुली एवढ्या गोंधळात सुध्दा शांत बसून पुस्तकात काहीतरी करत होती आणि काही अतिहुशार मुले स्वातंत्र्याचा स्वर्गीय आनंद उपभोगत होती . चौथा , ब - वर्ग , तसा थोडा कोपऱ्यात असल्याने जरा दुर्लक्षित झाला असावा , नाही तर आता पर्यंत कोणीतरी सरांनी येऊन झोडपून काढला असतातच ! वर्गात ४ रांगा - २ मुलींच्या , २ मुलांच्या . भारत - पाकीस्तान बॉर्डरपेक्षा पण जास्त सुरक्षा होती या मुलामुलींच्या बॉर्डरवर . एक मुलगा कि मुलगी इकडची तिकडे होणार नाही याचा अलिखित करार करून झालेला