Posts

उंच भरारी घेताना......

Image
उंच भरारी घेताना...... उंच भरारी घेताना जमीन सुटेल का याची खंत वाटते. मुळे रोवली जेथे, ती माती पोकळ होईल का याची धास्ती वाटते. कधी सभोवार होती मऊ मऊ लव्हाळी, आकाशी गेल्या का जमीन दूर वाटते..... उरात किती दाटले माझ्या  नयनी येताच दाटू लागते! मोठे व्हायचे म्हणून घर सोडले,  आता निवारा असूनही नजर भिरभिरू लागते. आई तुझ्या कुशीत शिरून एकदाचे निजू वाटते, तुझ्या उबदार छत्राखालीच मला जगू वाटते......

मला जन्म घेऊ द्या......

Image
मला जन्म घेऊ द्या...... अर्थ ना कळे मज  व्यर्थ हि क्षिणे मन आज  जगण्याची कला शिकवते  हि उदास भकास वाट... बेसूर भासतो सूर्य -चंद्र  जणू कोपली धरा, अन्न पाण्याविना मी कासावीस  लाही लाही मातेच्या उदरा... कुणा ना दया इथे कुणाची  तारक- मारक एक समान  जन्मदाताच गर्भी मारतो  कुणाकडे मागू न्याय आज .....

मी एक मुलगी अन तू एक मुलगा...

मी एक मुलगी अन तू एक मुलगा... ना प्रेम होते खोटे , ना खोट्या  होत्या भावना . तरीही विरह का घडावा, असा काय केला गुन्हा. स्वछ होते मन, पवित्र होते नाते तरी पण, का दुरावलो सांग ना, भांडावे हा प्रश्न माझं पुन्हा पुन्हा.,,, का कुणा ना कळती वेदना,  ना कळतील आपल्या भावना  रीत न्यारी, न्यारे जगाचे शहाणपण  जगालाच दे समजावून म्हणा ! ना भांडण तुझे नि माझे, तरी हा गूढ अबोला  एकाच गोष्ट कळे जागी बस  मी एक मुलगी अन तू एक मुलगा... तुझ्यात आणि माझ्या फक्त तेच एक नाते असावे  अशी का या जगाची मित्थ्या कल्पना .... का तू असू शकत नाहीस  भाऊ ,मित्र वा पित्यासमान  कसे पटवून देऊ जगाला सांग परमेश्वरा!!!!!! 

कळी खुलतांना....

Image
कळी खुलतांना.... कळत नकळत कळी खुलतांना, तिचे सौंदर्य खुलत असते, सुगंध दरवळत असतो.... लटकेच वाऱ्याच्या झुळुकेने नाचणारी,  कळी आता फुल होणार असते. कळी ते फुल हा प्रवास जेवढा सुखद असतो, तेवढेच बदल पण होतात... नैसर्गिकतेने! रंग, देहबोली, हावभाव आणि चंचलता.... कधी बंद पाकळ्यात राहिलेली कळी  आज पाकळी पाकळी उकलत जाते. हवे तेवढे स्वतंत्र उपभोग घेण्यासाठी धजावते... तिला मोठे व्हायचे असते आयुष्य संपण्याआधी! तिचे पण ध्येय असतील ना इतरांपरी.. प्रत्येक पाकळी वेगळी असली तरी एकाच सुगंध तिला, छटा रंगांची बदलणारी , तरी हर्ष तिला. कोणी तोडून नेईल याची माळ्याला भीती, कोणी कुस्करून टाकेल , करते जननी काळजी, कोणी भुंगा यावा आणि मधुर सुगंध प्राशन करावा  कोणी फुलपाखरू क्षणभर थांबून जावा  कोणी मायेने तोडावी आणि अर्पण करावी विधात्याला. मग काय कळीचे आयुष्य नसतेच का सुखद  ती हि वाट पाहत असेल कोण्या एका स्पर्शाची  होणाऱ्या हर्ष्याची, अदभूत आनंदाची आणि सुरक्षिततेची .....
Confession   दिये बुझाने लगे जब दोस्तीके  फिर भी मैं चुप रही| तू भी जाने क्यू न सुनती गयी, तेरी ख़ामोशी क्यू सजा मिली | ऐसा क्या ग़ुनाह किया...के  मेरी खाताबही वो भी न पता चली.. तुझे दिलसे चाहा था शायद यही गलती मेरी | अब सवाल यही है गहरा.... क्या तुझे मैं समाज न पायी या फिरर... समझ कभी कुछ कर न पाई| बोहोत बुरा हुआ ..... मेरी आंखोसे झलकता प्यार न दिखा, मेरी भावनाओंकी अर्थी न दिखी, और न देखीं मेरी सच्चाई| हाय!!!! देखा तो क्या देखा... मेरी बातें बचकानी, मेरा गुस्सा, मेरी नादानी!!!! Dear SAKHI,    You are the person , who can understand me better, but many time ignores me. I don't know how to deal with you . I really won't care if anyone had done this, but u.... I can't believe!!! You are that puzzle that I couldn't understand and no matter that I could get solution.     You know your value in my life. That was the day when I felt WOW I had you and  now this is the day, today your silence killed me!!! I better know you don'
 वो  वो लापर्वा नहीं पर  हमारी फ़िक्र नहीं करते. वो काबिले तारीफ है पर  हमें तारीफ ए लब्ज नहीं कहते. वो पास हि होते है पर  अब साथ नहीं लगते.... नज़ारे चुराकर बात करने लगे है वो  आज अपने कम और अजनबी ज्यादा लगे! उनसे बात किये जैसे अरसा होगया  उनकी मुस्कान देखना मानो एक सपना होगया .. पता नहीं ऐसा क्या हुआ.. हम सोचते रहगये और वक्त निकलता गया ...   छोडो कब तक जान आँखोमे रोकेंगे  आज इसे आज़ाद करही देते...  तुमसे बात न सही पर तुम्हारे तस्वीरको कुछ चंद लम्हे और देख लेते.... # ग सखे!!! 
डर जब मैं अगले साल नहीं रहूंगी तो... तब क्या कुछ बदल जायेगा हमारे बिच . यहाँ की ठंडी वैसी ही रहेगी बस्स... हमारा साथ छूट जायेगा. शायद तुम लोग नए कमरेमे जाओगे और... नया दौर, नयी बातें... हमारा आशियाना बदल जायेगा. दोस्ती बदल जाएगी? दोस्तीके चहरे बदल जायेंगे.. और.. हमारी यादें कमरेमे बंद कर  .क्या चाबी कही खोजाएगी... मुझे कभी डर नहीं लगता, पर आज लगा! बिछड़ जानेका डर, तुम सब से दूर जानेका डर, और फिर... शायद कभी न मिलने का डर.... # ग सखे!!!