ग सखे!...      तू जाताना, नकळत तुझ्यामागे पावले चालत होते,   तू जाताना, अश्रू माझीच नजर चुकवून बाहेर डोकावर होते   खूप आपलेपणा दिला कि असे होते का ग सखे!   होस्टेलकडे परत पाय वळत नव्हती...   सावरलं स्वतःला आणि रूममध्ये परतली,   आता तर परिस्तिथी आधीपेक्षाही भयान होती.   तू नव्हतीस पण तुझा आभास होता,   तू नव्हतीस पण तुझ्या वस्तूंचा सहवास होता,   तुझी चप्पल, चादर, बंद कपाट आणि पुस्तकांचा पसारा....   मन भरून आले , खरंच ग सखे नाहीच जमले    घळाघळा अश्रू वाहून गेले, सारे कसे थांबून गेले.   नेहमी स्वतःच्या घोंडीत शिरणारी मी,   आज तुझ्या ब्लॅंकेटमध्ये विसावले होते,   तुझी बारीक, निर्जीव उशी उराशी घेउन निजले होते.   कोणाच्या वस्तुंना साधा स्पर्शही न करणारी मी,    चार बोटे लांब होणारी तुझी चप्पल पायात घालून मिरवत होते.   आता रात्र झाली होती, मी कूस बदलत होते,   थापटून झोपी जाण्याची सवय का ग लावली!    बघ आता, किती जड जाते होते.    शेवटी तुझा उबदार, प्रेमळ हात डोक्यावरच आहे,    असे स्वतःला समजावत कधीतरी रात्री डोळे मिटले होते.